'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:02 IST2022-02-23T14:01:18+5:302022-02-23T14:02:31+5:30
Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकची चर्चा होताना दिसते आहे.

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते
मराठी टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका कमी कालावधीत लोकप्रिय ठरली. मालिकेतील नवीन ट्विस्ट आणि कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती फोटो शेअर करत असते. दरम्यान मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकची चर्चा होताना दिसते आहे.
अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अभिनेत्रीच्या लेकीनेच क्लिक केला आहे. या फोटोत तिच्या गालावरील खळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
मधुराणीच्या या फोटोवर एका युजरने कमेंट केली की, स्वरालीने खूप छान फोटो काढला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की,तुला खळी खूप सुंदर दिसते. आणखी एका युजरने म्हटले की, गालावरची खळी व खळखळाट हास्य घायाळ करते आरु!!!जसं तू सध्या आशूतोषला करतेस!!!
अरुंधती शोधतेय नवीन घर
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती देशमुखांच्या समृद्धी बंगल्यातून बाहेर पडली आहे. सध्या ती तिच्या आईच्या घरी राहते आहे. मात्र तिथूनदेखील ती लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहे. आशुतोषच्या ऑफिसपासून जवळपास ती राहण्यासाठी भाड्याने घर शोधते आहे. तर दुसरीकडे संजना कांचन आईचे कान भरताना दिसते आहे. ती आईंना अरुंधतीच्या विरोधात भडकवून घरावरील हक्क सोडण्यास सांगते आहे.