'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:53 IST2022-06-25T17:52:55+5:302022-06-25T17:53:43+5:30
Ashvini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती.

'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका
कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी पंढरपूरची वारी ( Pandharpur Vari) होत आहे. हरिनामाच्या गजरात अनेक भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनीही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे. आई कुठे काय करते फेम अनघा उर्फ अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) वारीच्या वाटेवर निघाली आहे. अश्विनीनं वारकऱ्यांबरोबर हरिभजनाच्या गजरात ठेका धरला. अश्विनी महांगडे हिने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंना आणि व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. तिथे तिनं तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. इतकच नाही टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला. तसेच तिने फुगडीदेखील घातली.
दोन वर्षांनंतर वारीचा पुरेपूर आनंद लुटताना अश्विनी दिसली. यावेळी अश्विनीने मरून रंगाची नववारी साडी नेसली होती. अश्विनीने वारीतील तिचा व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, माऊली माऊली....माऊली माऊली....माऊली माऊली ....रूपं तुझे....जिथे तिथे फक्त आणि फक्त माऊली.
अश्विनीचे वारीतील फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. एका चाहत्यानं म्हटलंय, अभिनेत्री असावी तर अशी. तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, वाह ताई खूप छान. तर आणखी एका चाहत्याने म्हटले की,ताई तुझा खूप अभिमान वाटतो.