'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:12 IST2022-02-15T14:11:58+5:302022-02-15T14:12:25+5:30
Aai Kuthe Kay Karte: अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या पार्टनरचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.

'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तो?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या देशमुख कुटुंबात अरुंधतीची जागा अभिषेकची पत्नी अनघाने घेतली आहे. घरात ती सर्वांची अरुंधतीसारखी काळजी घेताना दिसते आहे. अनघाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या पार्टनरचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.
अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर तिचा आणि तिच्या पार्टनरच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले की, वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा बाबा..निलेश जगदाळे. यश आणि अपयश जे काही असेल ते पाहताना तुम्ही सोबत आहात याचा आनंद आहे बाबा. 'सगळ्यांना सोबत घेवून पुढे जाणे' हा तुमचा विचार सगळ्यात जास्त भावला. खूप खूप खूप शुभेच्छा बाबा.
अश्विनी महांगडे निलेश जगदाळे याला डेट करते आहे. तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
आई कुठे काय करते मालिकेशिवाय अश्विनी महांगडेने अस्मिता मालिकेत काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत राणू आक्काची भूमिका तिने साकारली. तिने साकारलेली ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली. अश्विनीने मराठी चित्रपटातही काम केले आहे. ती टपाल आणि बॉईज या मराठी चित्रपटात झळकली आहे.