आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:07 IST2024-11-03T13:06:43+5:302024-11-03T13:07:37+5:30

रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे. 

aai kuthe kay karte fame actress rupali bhosale buys new car on diwali 2024 | आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

रुपाली भोसले ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीला 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत संजना हे खलनायिकेचं पात्र साकारून रुपाली घराघरात पोहोचली. रुपालीचा चाहता  वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे. 

अनेक सेलिब्रिटी दिवाळीत नवीन घर, गाडी खरेदी करतात. यंदाच्या दिवाळीला रुपालीनेदेखील मुहुर्त गाठला आहे. काही महिन्यांपूर्वीच घराचं स्वप्न पूर्ण केलेल्या रुपालीने दिवाळीत नवी कोरी गाडी घरी आणली आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन गाडी खरेदी करण्यासाठी रुपाली तिच्या कुटुंबीयांसोबत गेली होती. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी रुपालीचं अभिनंदन केलं आहे. 


जुलै महिन्यातच रुपालीने घर खरेदी करत तिचं गृहस्वप्न साकार केलं होतं. त्यानंतर आता काहीच महिन्यांनी तिने नवीन कार खरेदी केली आहे. रुपालीने टोयोटो कंपनीची कार खरेदी केली आहे. सध्या रुपाली 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Web Title: aai kuthe kay karte fame actress rupali bhosale buys new car on diwali 2024