'आई कुठे...' फेम अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी, Video शेअर करत म्हणाली, "असे क्षण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:39 IST2023-05-17T15:24:55+5:302023-05-17T15:39:12+5:30

लेक स्वराली सोबत मधुराणी कुठे निघाली?

aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar off to australia with her daughter | 'आई कुठे...' फेम अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी, Video शेअर करत म्हणाली, "असे क्षण..."

'आई कुठे...' फेम अरुंधतीची लेकीसोबत परदेशवारी, Video शेअर करत म्हणाली, "असे क्षण..."

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar)  घराघरात पोहोचली आहे. प्रत्येकाला ती आपल्याच घरातील सदस्य असल्यासारखे वाटते. तिच्या अभिनयामुळे गृहिणींना खऱ्या आयुष्यात प्रेरणा मिळाली आहे. सतत मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने कुटुंबाला वेळ देता येत नाही. तरी आता सुट्टी काढून मधुराणी लाडक्या लेकीसोबत परदेशात निघाली आहे.

मधुराणीची लेकीसोबत परदेशवारी 

अभिनेत्री मधुराणीला एक मुलगी आहे जिचं नाव स्वराली. लेकीसोबतचे अनेक गोड क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणी शूटिंगनिमित्त मुंबईत राहते तर तिचं कुटुंब पुण्यात असतं. त्यामुळे बरेच दिवस ती लेकीपासून दूर असते. आता मात्र तिने शूटिंगमधून ब्रेक घेत लेकीला वेळ द्यायचं ठरवलंय. दोघी मायलेकी थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्या आहेत. विमानतळावरचा त्यांचा छानसा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.

'ऑफ टू ऑस्ट्रेलिया' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय. मुलीसोबत फिरायला जाण्याचे काही क्षण... असंही कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.  परदेशात फिरायला जाण्याचा आनंद दोघी मायलेकीच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतोय. तर दुसरीकडे मधुराणी मालिकेत दिसणार नाही का असे प्रश्न चाहत्यांना पडलेत. तिच्या कमेंट सेक्शनमध्ये केवळ मालिकेविषयीच तिला विचारलं जातंय. 'आम्हाला आणि आशुतोषला सोडून कुठे चाललीस?' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Web Title: aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar off to australia with her daughter