Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा मेकओव्हर पाहून आशुतोष झाला थक्क, तर अनिरुद्धची झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 13:09 IST2022-02-12T13:09:19+5:302022-02-12T13:09:42+5:30
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा मेकओव्हर पाहून आशुतोष झाला थक्क, तर अनिरुद्धची झाली अशी अवस्था
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या या मालिकेत अरुंधतीच्या नव्या अल्बमचा बोलबोला ऐकायला मिळत आहे. नुकतेच अरुंधतीने तिच्या पहिल्या अल्बमचे रेकॉर्डिंग केले आहे. दरम्यान नुकताच मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तिचा मेकओव्हर पाहायला मिळाला. तिच्या या नव्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच आई कुठे काय करतेचा नवा प्रोमो पाहायला मिळाला. त्यात अलिबागला अरुंधती आणि आशुतोष त्यांच्या अल्बमच्या रेकॉर्डिंगसाठी गेले होते. मात्र रस्ता बंद असल्यामुळे त्यांना मुंबईत येता आले नाही. त्यामुळे तिथे एकाच्या घरी थांबतात. तिथे काहीतरी कार्यक्रम असतो. त्यावेळी अरुंधती पंजाबी ड्रेसमध्ये येते. तिचा हा मेकओव्हर पाहून आशुतोष थक्क होतो. तो तिच्याकडे एकटक पाहत राहतो. तर दुसरीकडे अरुंधती आशुतोष सोबत एकटी अलिबागला गेली म्हणून अनिरुद्धचा जळफळाट होत असतो. त्यात आता रात्री पण ती त्याच्यासोबत असणार म्हटल्यावर त्याचा संताप अनावर होतो. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो.
अरुंधती कुठे थांबलीय ते घरी कळवते. तिथला नंबर घरच्यांना देते. कारण तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. अनिरुद्ध खूपच अवस्थ होतो आणि तो त्या लँडलाइनवर कॉल करतो आणि अरुंधतीबद्दल विचारतो. त्या घरातला एक मुलगा फोनवर अनिरुद्धला सांगतो की अंकल आँटी आताच झोपायला गेले. हे ऐकून अनिरुद्धचा संताप अनावर होतो. आता अरुंधती घरी आल्यानंतर अनिरुद्ध पुन्हा सगळ्यांसमोर तिच्याशी वाद घालेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.