Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:07 IST2022-03-03T18:55:02+5:302022-03-03T19:07:45+5:30

मधुराणीला खऱ्या जीवनात एक लहान मुलगी आहे. या मुलीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Aai Kuthe Kay Karte: Arundhati's video with her daughter | Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..'

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..'

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत.

अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली मधुराणी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर तिच्या कुटुंबियांसोबतचे काही फोटो शेअर करत असते.  मधुराणीला खऱ्या जीवनात एक लहान मुलगी आहे. या मुलीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीच्या मुलीचं नाव स्वराली असून ती शाळेत जाते. नुकताच मधुराणीने सोशल मीडियावर मुलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मधुराणी स्वरालीने तिच्या वाढदिवसानिमित्त बनवलेले ग्रीटिंग कार्ड दाखवतेय. "सुखाचे चांदणे"  तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादानी कालचा दिवस सुखाचा गेला....सर्वांचे खूप खूप मनापासून आभार हेच तर आयुष्यातलं सुखाचं चांदणं. या व्हिडीओवर कमेंट करताना चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, मधुराणी गोखले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास मोठ्या पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte: Arundhati's video with her daughter