‘आई कुठे काय करते? ’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर ;‘सौ. अरूंधती’ नाही, आता फक्त ‘अरूंधती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:21 IST2021-08-02T14:21:42+5:302021-08-02T14:21:59+5:30

'आई कुठे काय करते?' मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अरूंधती आणि अनिरूद्धचा घटस्फोट होत आहे. हे दोघं एकमेकांपासून कायमचे वेगळे होत आहेत.

'Aai Kuthe Kay Karte?' On the adventurous turn, now Mrs. Arundhati Deshmukh, just to be Arundhati | ‘आई कुठे काय करते? ’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर ;‘सौ. अरूंधती’ नाही, आता फक्त ‘अरूंधती’

‘आई कुठे काय करते? ’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर ;‘सौ. अरूंधती’ नाही, आता फक्त ‘अरूंधती’

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते?'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे यश आणि गौरीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात साजरा झाला आहे आणि दुसरीकडे आता अनिरुद्ध अरुंधतीचा घटस्फोट होणार आहे. हे दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे होत आहेत. मात्र अशातच एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. 


आप्पा अरूंधतीला घटस्फोटानंतरही समृद्धी घरात येऊ शकते असे सांगूनही ती वेगळा निर्णय घेणार असे दिसत आहे. २५ वर्षांपूर्वी हा उंबरठा ओलांडून आत आले. आज सुद्धा ओलांडतेय, कधीही परत न येण्यासाठी. अरूंधतीच्या या वाक्यामुळे अरुंधती या घरात परत पाय ठेवेल का हे माहित नाही. मात्र घर आणि घरातील लोकांना अरुंधतीची सवय असल्यामुळे तिचे घर सोडून जाण्यामुळे सर्वांनाच तिची उणीव जाणवते आहे. अरूंधती असताना आपण किती वाईट वागलो याची जाणीव आईंना झाली आहे. आपण फक्त अरूंधती म्हणजे आपल्या सुनेलाच गमावले असे नाही. मी माझी मैत्रिण, माझी मुलगी आणि माझी आई गमावली आहे, याची जाणीव आईंना होता. आता आजीच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच त्रास होतो. 


कोर्टात अरूंधती आणि अनिरूद्ध घटस्फोटावर सह्या करतात आणि कायमचे वेगळे होतात. मात्र नंतर अरूंधतीच्या लक्षात येते की, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच आहे. जे नाते राहिलेच नाही त्याचा अलंकार का घेऊन मिरवायचा. म्हणून अरूंधती गळ्यातील मंगळसूत्र काढून अनिरूद्धकडे देते. 


आतापर्यंत मी अरूंधती अनिरूद्ध देशमुख होते. आता मी अरूंधती आहे, असा मनात विचार करत अरूंधती पुढील आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. मात्र या सगळ्यात अरूंधतीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Web Title: 'Aai Kuthe Kay Karte?' On the adventurous turn, now Mrs. Arundhati Deshmukh, just to be Arundhati