Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 11:48 IST2023-01-28T11:39:49+5:302023-01-28T11:48:09+5:30

Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. आता एका मुख्य अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याची चर्चा आहे.

'Aai Khe Kay Karte' fame Gauri kulkarni will exit from serial? | Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान या मालिकेतील एका कलाकाराने ब्रेक घेतला आहे. दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली असल्याची चर्चा. 

 अरुंधतीचा मुलगा यश आणि त्याची होणारी पत्नी गौरी ही सगळ्यांची आवडती जोडी आहे. गौरी आणि यशचा साखरपुडा झाला आहे. दोघेही लवकरच लग्नसुद्धा करणार होते. मात्र अचानक गौरीने यशच्या आयुष्यातून एक्झिट घेतली. ती तिच्या आई बाबांकडे अमेरिकेला निघून गेली होती. गौरी कुलकर्णीने या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली असल्याचं कळतंय. गौरी आता सन टीव्हीवरील नव्या मालिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. सन मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत गौरी कुलकर्णी झळकणार आहे.

आता गौरी नव्या मालिकेत दिसणार म्हटल्यावर आई कुठे काय करते मधून ही गौरी कायमची एक्झिट घेणार कि तिच्या जागी नवी अभिनेत्री पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


 

Web Title: 'Aai Khe Kay Karte' fame Gauri kulkarni will exit from serial?