'कमळी'च्या जिद्दीची परीक्षा, अनिकाने रचलेला डाव होणार का यशस्वी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:29 IST2025-07-31T17:28:53+5:302025-07-31T17:29:20+5:30

Kamali Serial: 'कमळी' ही केवळ एक मालिका नसून, शिक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या एका सामान्य मुलीची असामान्य कहाणी आहे.

A test of 'Kamali's' stubbornness, will Anika's plan be successful? | 'कमळी'च्या जिद्दीची परीक्षा, अनिकाने रचलेला डाव होणार का यशस्वी?

'कमळी'च्या जिद्दीची परीक्षा, अनिकाने रचलेला डाव होणार का यशस्वी?

'कमळी' (Kamali Serial) ही केवळ एक मालिका नसून, शिक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या एका सामान्य मुलीची असामान्य कहाणी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या कमळीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. 

'कमळी' मालिकेत सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे. कमळीसाठी इंग्रजीचा पेपर फक्त एक विषय नसून तो तिच्या पुढील शिक्षणाच्या संधीसाठीचं प्रवेशद्वार आहे. हा पेपर पास करणं तिच्यासाठी अत्यावश्यक आहे, पण अनिकाने तिच्या यशावर पाणी फिरवण्याचा डाव आखला आहे. अभ्यासाचं साहित्य नष्ट करणं, चुकीची प्रश्नपत्रिका देणं अशा खोडसाळ आणि हेतु पूरस्सर कृतीतून कमळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न अनिका करत आहे.  


या सगळ्या अडथळ्यांवर मात करत कमळीनं परीक्षेला बसण्याचं धाडस दाखवलं. पण खऱ्या संकटाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा तिची खरी उत्तरपत्रिकाच नष्ट करण्यात आली. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे तो म्हणजे तिचा मित्र ऋषी आणि अन्नपूर्णा मॅडम. ते कॉलेज प्रशासनाकडे कमळीच्या बाजूने ठाम उभे राहणार आहेत आणि तिला दुसरी संधी मिळवून देणार आहेत. कमळीने या दुसऱ्या संधीचं सोनं करण्याची पूर्ण तयारी केली आहे. अधिक मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती पुन्हा परीक्षा देणार आहे. कमळीचा हा प्रेरणादायी संघर्ष प्रत्येकासाठी एक शिकवण आहे, की सत्य आणि मेहनत कधीच अपयशी ठरत नाही. कमळीची हीच ताकद आणि तिच्या प्रवासाची प्रेरणा अनुभवण्यासाठी मालिका पाहावी लागेल.

Web Title: A test of 'Kamali's' stubbornness, will Anika's plan be successful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.