'सावळ्याची जणू सावली'मध्ये धक्कादायक वळण, सारंगला होणार अटक आणि सावलीची सत्यासाठी लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:58 IST2025-09-18T14:57:33+5:302025-09-18T14:58:09+5:30

Savalyanchi Janu Savali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिका (Savalyanchi Janu Savali Serial) आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. 

A shocking twist in 'Savalyanchi Janu Savali', Sarang will be arrested and Savali will fight for the truth | 'सावळ्याची जणू सावली'मध्ये धक्कादायक वळण, सारंगला होणार अटक आणि सावलीची सत्यासाठी लढाई

'सावळ्याची जणू सावली'मध्ये धक्कादायक वळण, सारंगला होणार अटक आणि सावलीची सत्यासाठी लढाई

'सावळ्याची जणू सावली' मालिका (Savalyanchi Janu Savali Serial) आपल्या उत्कंठावर्धक कथानकाने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करत आहे. घरगुती नात्यांमधील नाजूक गुंतागुंत, सत्तेचा खेळ आणि प्रेमाच्या नात्याची कसोटी हे सर्व घटक एकत्र आणत ही मालिका आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. 

शिवानी राजशेखर हळूहळू सारंगच्या आयुष्यात हुशारीने शिरते. सावलीला हा बदल जाणवलाय, पण तिच्या संशयाला कोणताही ठोस पुरावा नाही. दरम्यान, ऐश्वर्या आणि राजकुमार यांची गुप्त भेट एक नवीन कट निर्माण करते. ज्याचा उद्देश आहे, सावली आणि सारंगच्या आयुष्याचा पूर्ण विनाश! शिवानी सारंगसमोर तिचं प्रेम व्यक्त करते पण तो तिच्या मोहाला बळी न पडता, ठामपणे सावलीप्रती आपली निष्ठा व्यक्त करतो. 


दुखावलेली शिवानी सूडाच्या आगीत सारंगला संपवण्याची शपथ घेते. त्याचवेळी एका तरुण मॉडेलच्या प्रकरणात सारंग अडकतो, आणि परिस्थिती इतकी बिघडते की त्याच्यावर खूनाचा आरोप  येणार आहे. शिवानीने लीक केलेलं सीसीटीव्ही फुटेज, मॉडेलचा संशयास्पद मृत्यू, आणि मीडिया ट्रायल यातून सारंगला अटक होते. आता संपूर्ण घर उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सगळ्यात सावली एकटी पडली आहे. पण तिचा निश्चय अढळ आहे सारंगसाठी आणि सत्यासाठी. त्यामुळे सावली सारंगला या संकटातून कसं बाहेर काढेल, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: A shocking twist in 'Savalyanchi Janu Savali', Sarang will be arrested and Savali will fight for the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.