'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत लगीनघाई, नयना आणि अद्वैतच्या लग्नात येणार नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 17:45 IST2024-01-31T17:45:06+5:302024-01-31T17:45:22+5:30
Laxmichya Pavalani : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सुरु आहे नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत लगीनघाई, नयना आणि अद्वैतच्या लग्नात येणार नवा ट्विस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अक्षर कोठारी, ईशा केसकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका कायमच टीआरपी चार्टमध्ये टॉप ५ मध्ये पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत लग्नसराई पाहायला मिळणार आहे.
लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत सुरु आहे नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे.
साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची. नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत. त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.