आदित्य-पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:34 IST2025-03-24T15:33:47+5:302025-03-24T15:34:12+5:30

Paaru Serial : 'पारू' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. आगामी भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे.

A new color will fill the unwavering feeling of love in Aditya-Paru's life. | आदित्य-पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग

आदित्य-पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग

'पारू' मालिका (Paaru Serial) एक मनोरंजक वळण घेत आहे. आगामी भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे. आदित्य समोर त्या डोळ्यांच्या मागच्या व्यक्तीच रहस्य समोर आल्यावर आणि हे कळल्यावर ती व्यक्ती पारूचं आहे. तो घाईघाईने पारूकडे पोहचतो, पण ती आधीच  निघून गेली आहे. आदित्य व्यथित आहे की जेव्हा त्याला सत्य समजलं, तेव्हाच पारू त्याला सोडून गेली. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही. 

पारूच्या आयुष्यावर याचा परिणाम होत आहे हे जाणून मारुती, तो  सौम्यपणे  ठाम स्वरात आदित्यला पारूपासून दूर राहण्यास सांगणार आहे. पण आदित्य आता पारुच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे. मारुतीचं बोलणं स्वीकारणं आदित्यला अशक्य होतंय. त्याला पारूला परत आणायचंच आहे या निश्चयाने आदित्य अहिल्याला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो. पण तो स्वतः एक निर्णय घेतो कि तो पारूला आपल्या प्रेमाची कबुली देणार नाही. तो तिचा आदर करेल, तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही. 

आता, पारू आणि आदित्य दोघांनाही माहित आहे की ते एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना त्यांच्या मर्यादाही ठाऊक आहेत. त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलंय. त्यांच्या नात्यात न बोलता समजून घेण्याची गोड कसरत निर्माण झाली आहे. जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकमेकांना पाहण्यास आतुर असतात, पण व्यक्त करायला धजावत नाहीत. प्रत्येक छोटासा क्षण पाहण्यासारखा आहे - चुकून एकमेकांकडे टाकलेली नजर, सहज लागलेला स्पर्श, एक साधं संभाषण हे सगळं खास होऊन जातं. जे आधी नेहमीसारखं वाटायचं, त्यातच आता जादू भरते. हे प्रेम त्यांच्या आयुष्यात अबोल भावना आणि नजरेतून एक नवा रंग भरणार आहे. 
 
 

Web Title: A new color will fill the unwavering feeling of love in Aditya-Paru's life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.