'जिवाची होतिया काहिली' मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 08:00 IST2022-11-09T08:00:00+5:302022-11-09T08:00:01+5:30

जिवाची होतिया काहिली ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

A new actress take a entry in jivachi hotiya kahili | 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या याविषयी

'जिवाची होतिया काहिली' मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या याविषयी

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत  कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

 अर्जुन रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच आता मालिकेत नवीन  व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे.

ती म्हणजेच मनीषाची. सिमरन ही गुणी अभिनेत्री मनीषाच्या  व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. सिमरन हिची हि पहिलीच मालिका असून ती तिची व्यक्तिरेखा कशी रंगवते हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. मनीषा आल्याबरोबरच सगळ्यांची मनं जिंकते आणि त्यामुळे रेवथीच्या मनात राग निर्माण होऊन अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल का, हे पाहणं उत्सुकतेचा ठरणार आहे. आता त्यांच्या गोष्टीला काय नवीन वळण  मिळणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: A new actress take a entry in jivachi hotiya kahili