मुलगा झाला हो...! मराठमोळी अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:58 IST2025-12-13T15:57:38+5:302025-12-13T15:58:20+5:30
मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिला पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सांगितले आहे.

मुलगा झाला हो...! मराठमोळी अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे लग्नाची बेडी मालिकेतील काजल म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा चिपडे. तिने सोशल मीडियावर डोहाळं जेवणाचे फोटो शेअर करत तिला मुलगा झाल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री ऋतुजा चिपडे हिने नुकतेच सोशल मीडियावर जूनमध्ये पार पडलेल्या डोहाळं जेवणाचे फोटोशूट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. खरंतर तिने २१ सप्टेंबरला बाळाला जन्म दिला आहे. तिने या पोस्टमधून तिला मुलगा झाल्याचे सांगितले आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, "आमचे जग नुकतेच निळे झाले आहे, अगदी गोड पद्धतीने" २१ सप्टेंबर २०२५. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री ऋतुजा चिपडे हिने स्वरूप कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाची बेडी मालिकेनंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. याआधी ती बायको अशी हवी, यशोदा, हिमालयाची सावली सुखी माणसाचा सदरा, डीव्होर्स के लिए कुछ भी करेगा या हिंदी सीरिज, नाटक, मालिकेतून ती झळकली आहे.