कुलस्वामिनी फेम ​रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर ५५ हजार फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:46 IST2017-09-12T10:16:01+5:302017-09-12T15:46:01+5:30

आपला आवडता कलाकार खऱ्या आय़ुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. त्यामुळे फॅन्स सोशल मीडियावर आपल्या ...

55 thousand followers on the Instagram of Kalswamini Fem Rashmi Anupt | कुलस्वामिनी फेम ​रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर ५५ हजार फॉलोअर्स

कुलस्वामिनी फेम ​रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर ५५ हजार फॉलोअर्स

ला आवडता कलाकार खऱ्या आय़ुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. त्यामुळे फॅन्स सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे सध्या सगळेच कलाकार सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहाण्यासाठी ते आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत असतात. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलत असतात.
आजकाल चित्रपटांप्रमाणेच मालिकांमधील कलाकार देखील तितकेच फेमस असतात. त्यामुळे सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांना आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींचे हजारो फॉलोअर्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यात आता स्टार प्रवाहच्या 'कुलस्वामिनी' या मालिकेतील आरोहीची भूमिका साकारणाऱ्या रश्मी अनपटचे नाव समाविष्ट झाले आहे. इन्स्टाग्रामवर रश्मीचे ५५ हजारहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. रश्मी यामुळे सध्या चांगलीच खूश आहे.
रश्मी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. त्यात मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यानच्या फोटोसोबत तिच्या खाजगी आयुष्यातील फोटोंचा देखील समावेश असतो. तसेच काही वेळा ती तिच्या अकाऊंटवर शुटिंगच्या दरम्यान होणाऱ्या मजा-मस्तीचे व्हिडिओ देखील पोस्ट करते. 
आस्तिक नास्तिकतेच्या वेगळ्या संघर्षाची कहाणी सध्या प्रेक्षकांना 'कुलस्वामिनी' या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत रश्मीने साकारलेल्या आरोही या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. रश्मी लग्नानंतर देवधर कुटुंबात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. मोकळ्या मनाची अशी ही मुलगी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तसेच या मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच रश्मीचे फॉलोअर्स प्रचंड वाढत आहेत. 
'कुलस्वामिनी' ही मालिका सुरू होण्यापूर्वी रश्मीचे इन्स्टाग्रामवर ३२ हजार फॉलोअर्स होते. ही मालिका सुरू होऊन आता काहीच महिने झाले आहेत. या मालिकेमुळेच अल्पावधीतच रश्मीचे फॉलोअर्स वाढून त्यांनी ५५  हजारांचा टप्पा देखील पार केला आहे.
प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे रश्मीही आनंदित झाली आहे. तिने आपल्या फॅन्सचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. 

Also Read : 'कुलस्वामिनी' मालिकेतील संग्राम साळवीचा हा संवाद होतोय लोकप्रिय

Web Title: 55 thousand followers on the Instagram of Kalswamini Fem Rashmi Anupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.