'उडान' मालिका घेणार 5 वर्षाचा लिप,अशी बदलणार कथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:15 IST2017-12-04T07:45:48+5:302017-12-04T13:15:48+5:30
'चकोर'ची प्रेमळ प्रमुख भूमिका मीरा देवस्थळे करत असलेल्या सामाजिक घटनांवर आधारित असलेल्या 'उडान' या शोने त्याच्या रंजक आणि समाजाशी ...

'उडान' मालिका घेणार 5 वर्षाचा लिप,अशी बदलणार कथा!
मालिकेतील 'चकोर' आणि 'सूरज'ची केमिस्ट्री रसिकांच्या चांगल्याच पसंतीस पात्र ठरली होती,चकोर आणि सूरजच्या सुरुवातीला हे दोघे सेटवर एकमेंकाशी फारच क्वचित बोलायचे.त्यामुळे असा अंदाज बांधला जायचा की पडद्यावर यांच्या जोडीला रसिक पसंत करणार नाहीत. मात्र हळूहळू चकोर आणि सूरजमधली मैत्रीचे नाते फुलत गेले.कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा हे एकमेंकाचे चांगले मित्र झाले आहेत.चकोरची भूमिका साकारत असलेल्या मीराचा विश्वास आहे की सूरजकडे अर्थात विजेंद्रकडे अभिनयाच्या तांत्रिक कौशल्याची चांगली जाण आहे.मीरा सांगते, तो नेहमीच मला माझा सीन्स आणखीन चांगला कसा होईल याबाबतचा सल्ला देतो आणि जेव्हा त्यांने दिलेल्या सूचनेचा नेहमीच मला अभिनयात फायदा झाला आहे.तो माझा अतिशय जवळचा मित्र झाला आहे.आमच्या मालिकेची यशाकडे होणारी घौडदौड पाहुन मला खूप कौतुक वाटत आहे.