​33 नराधमांनी केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 20:01 IST2016-05-29T14:31:17+5:302016-05-29T20:01:17+5:30

ब्राझीलमध्ये किमान 33 नराधमांकडून सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे ...

33 year-old girl raped by 16-year-old girl | ​33 नराधमांनी केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

​33 नराधमांनी केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

राझीलमध्ये किमान 33 नराधमांकडून सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे जगभर खळबळ उडाली आहे. मानव जातीला काळीमा फासणाºया या घटनेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. या घटनेचा सर्व स्तरातून वेगवेगळ्या माध्यमांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे. 

रिओ डे जानिएरो परिसरात ही घटना घडली असून याबाबत ब्राझीलमधील पोलिसांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. विशेष म्हणजे आरोपींमध्ये पीडित मुलीचा ‘बॉय फ्रेंडह्य’ सहभागी होता. सर्व आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण घटनेचे शुटिंग केले आणि त्यानंतर ते सोशल मिडियावर अपलोड केले. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

केवळ बलात्काराच्या नव्हे तर ब्राझीलमधील इंटरनेट कायद्यांतर्गतही आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात नेमका किती जणांचा सहभाग होता याबाबत पोलिसांना स्पष्टता नसून किमान 30 आरोपी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत नेटिझन्सनी ब्राझीलमधील अशा गुन्हेगारी संस्कृतीला नष्ट करून पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित मुलीला प्रचंड मोठा धक्का बसला असून वैद्यकीय उपचारांसह तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे.

Web Title: 33 year-old girl raped by 16-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.