२४ मालिकेत मराठमोळा शिवराज महत्वपूर्ण भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:11 IST2016-07-22T11:37:48+5:302016-07-23T13:11:04+5:30

अनिल कपूरची निर्मिती असलेली व अभिनय देव दिग्दर्शित २४ सेकंड सीजन  मालिका कलर्स या वाहिनीवर चांगलीच गाजली. आता या ...

In the 24th series Marathambolo Shivraj played an important role | २४ मालिकेत मराठमोळा शिवराज महत्वपूर्ण भूमिकेत

२४ मालिकेत मराठमोळा शिवराज महत्वपूर्ण भूमिकेत

िल कपूरची निर्मिती असलेली व अभिनय देव दिग्दर्शित २४ सेकंड सीजन  मालिका कलर्स या वाहिनीवर चांगलीच गाजली. आता या मालिकेचा  दुसरा भाग शुट करण्यात आला आहे. या भागात मराठमोळा अभिनेता शिवराज वाळवेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त ओमप्रकाश खुराणा यांची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. २४ सेकंड सीजन २ या मालिकेतील माझी भूमिका  महत्वाची आहे. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अनिल कपूर, आशिष विद्यार्थी, साक्षी तन्वर अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी या मालिकेत काम केले आहे.  यापूर्वी शिवराज वाळवेकर यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. शूट अ‍ॅट वडाळा, जज्बा, गब्बर इज बॅक अशा गाजलेल्या चित्रपटात शिवराज यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. तर मराठीत योद्धा, ७२ मैल एक प्रवास, पेईंग घोस्ट, पितृऋण अशा अनेक चित्रपटातून त्यांनी काम केले आहे. आगामी त्यांचे हिंदीमध्ये त्यांचे नब्बे, दुरांतो, इश्क ने क्रेजी किया रे तर मराठी साम दाम दंड भेद, लादेन आला रे, सूरसपाटा असे अनेक चित्रपट आहेत. 

Web Title: In the 24th series Marathambolo Shivraj played an important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.