20 साल बाद, आयेगा सैलाब..... एकत्र येणार सचिन-रेणुका ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 11:00 IST2017-03-01T05:30:49+5:302017-03-01T11:00:49+5:30

छोट्या पडद्यावर नव्वदच्या दशकात गाजलेली मालिका म्हणजे सैलाब. ही मालिका रसिकांच्या घराघरात पोहचली. मालिकेची कथा सा-यांनाच भावली. शिवाय यातील ...

20 years later, will come Salma ... will come together Sachin-Renuka? | 20 साल बाद, आयेगा सैलाब..... एकत्र येणार सचिन-रेणुका ?

20 साल बाद, आयेगा सैलाब..... एकत्र येणार सचिन-रेणुका ?

ट्या पडद्यावर नव्वदच्या दशकात गाजलेली मालिका म्हणजे सैलाब. ही मालिका रसिकांच्या घराघरात पोहचली. मालिकेची कथा सा-यांनाच भावली. शिवाय यातील दोन मराठमोळे कलाकार, त्यांचा अभिनय, त्यांची केमिस्ट्रीही रसिकांना तितकीच भावली. हे दोन कलाकार म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता सचिन खेडेकर. दोघांच्या अभिनयाच्या जादूने रसिकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा तब्बल 20 वर्षानंतर ही मराठमोळी जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
 
रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर 20 वर्षांनी एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या त्या मूळात रेणुका शहाणे यांच्या एका सेल्फीमुळे. सचिन खेडेकरसोबतचा सेल्फी त्यांनी सोशल मीडियावर शेअरल केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक पोस्टही टाकली. “सचिन खेडेकरसोबत तब्बल 20 वर्षांने शूटिंग करत आहे. हे शूट सैलाब-2 चे आहे का ?, नाही, हे त्याहून काही तरी वेगळे, छोटे आणि तितकंच खास. लवकरच येत आहे”. अशी पोस्ट रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर त्या सेल्फीसह टाकली. त्यामुळे मराठीतील हे दोन बडे कलाकार पुन्हा एकदा एका मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत.
 
नव्वदीच्या दशकात रवि राय यांनी दिग्दर्शित केलेली 'सैलाब' ही मालिका गाजली होती. या मालिकेत रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका होती. या मालिकेचे कथानक या दोघांभोवतीच फिरणारं होतं. व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यात स्थिर नसलेली व्यक्तीरेखा सचिन खेडेकर यांनी साकारली होती. या मालिकेत रेणुका शहाणे साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचे सचिन खेडेकर साकारत असलेल्या व्यक्तीरेखेवर प्रेम असते. मात्र रेणुका शहाणे यांचे पालक असलेला त्यांच्या भावाला ते मान्य नसतं. त्यामुळे इमोशनली ब्लॅकमेल करत तो रेणुका यांचं लग्न दुस-या एका व्यक्तीशी लावून देतो. त्यानंतर ब-याच वर्षानंतर जेव्हा मालिकेत रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर भेटतात तेव्हा त्या दोघांचंही दुस-या व्यक्तीशी लग्न झालेले असते. मात्र असं असलं तरी त्यांच्यातल्या नात्यातील प्रेमसंबंध तितकेच घट्ट असतात. त्यानंतर ते दोघं एकमेंकांना भेटतात आणि दोघांमध्ये ते आकर्षण कायम असतं असं सैलाबचं कथानक होतं. सैलाब मालिकेतील गाणी दिवंगत गझल गायक जगजीत सिंग यांनी गायली होती तर संगीत तलत अझीझ यांनी दिलं होतं.

Web Title: 20 years later, will come Salma ... will come together Sachin-Renuka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.