2 MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर कार्यक्रमाचा देखणा सेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 14:43 IST2017-02-24T09:11:58+5:302017-02-24T14:43:29+5:30

डान्स रिअॅलिटी शो 2 MAD हा स्पर्धकांच्या एक से बढकर एक परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.दिवसेंदिवस स्पर्धकांच्या परफॉर्मन्स ...

2 MAD Maharashtra's genuine dancer program set! | 2 MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर कार्यक्रमाचा देखणा सेट !

2 MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर कार्यक्रमाचा देखणा सेट !

न्स रिअॅलिटी शो 2 MAD हा स्पर्धकांच्या एक से बढकर एक परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.दिवसेंदिवस स्पर्धकांच्या परफॉर्मन्स आणि पाहुण्या कलाकरांची हजेरीमुळे या कार्यक्रमात आणखीच चांगली रंगत आणत आहे.या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने परीक्षक म्हणजेच अमृता खानविलकर, उमेश जाधव, संजय जाधव आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे यात वाद नाही.



या कार्यक्रमाचा सेट देखील खूपच आकर्षक आहे. हा सेट बनविण्यासाठी तब्बल ८ दिवस लागले आणि जवळजवळ ८० ते १०० माणसांनी मिळून हा सेट बनवला आहे. हा सेट तीन भांगामध्ये विभागला आहे जुरी टेबल, मेन स्टेज जिथे आपले स्पर्धक डान्स करतात आणि  कंटेस्टंट एरिया  (MAD झोन आणि SAD झोन). जुरी टेबलच्या  इथे पिसाऱ्यासारखे दिसणारे आकर्षक डिजाईन तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे लाईटस वापरले गेले आहेत अश्या प्रकारची स्टेजची रचना प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे.




एरवी अशा जागी प्लाझ्मा टीव्ही किंवा हा भाग सजविण्यासाठी वेगळ्या प्रकारची साधने वापरण्यात येतात. तसेच कार्यक्रमातील मार्किंग सिस्टम देखील प्रेक्षकांना आवडू लागली आहे. १ ते १० मार्कांऐवजी वा स्माईलीज देण्याऐवजी सिग्नलद्वारे मार्किंग दिले जाते. स्पर्धकांना लाल आणि ग्रीन कलर्सचे सिग्नल दिले जातात, जजेसच्या सीटच्या मागे असलेल्या पिसाऱ्यामध्ये लाल अथवा ग्रीनच्या सिग्नलद्वारे त्यांना MAD अथवा SAD झोनमध्ये पाठवले जाते.त्यामुळे या शोचा भव्य सेट, उत्तम जज आणि एक से बढकर एक स्पर्धकांमुळे हा शो रसिकांचे लक्ष आपल्याकडे खेचण्याच यशस्वी ठरत आहे. 

Web Title: 2 MAD Maharashtra's genuine dancer program set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.