फसव्या जाहिरातीतील सेलिबे्रेटींना १० लाख दंड व तुरूंगवास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 19:27 IST2016-04-16T13:57:57+5:302016-04-16T19:27:57+5:30
आपल्या उत्पादकाचा खप वाढविण्यासाठी लहान मोठ्या कंपन्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिबे्रटींचा जाहिरातीसाठी वापर करीत असतात. सेलिबे्रटींनी केलेल्या ...

फसव्या जाहिरातीतील सेलिबे्रेटींना १० लाख दंड व तुरूंगवास?
आ ल्या उत्पादकाचा खप वाढविण्यासाठी लहान मोठ्या कंपन्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिबे्रटींचा जाहिरातीसाठी वापर करीत असतात. सेलिबे्रटींनी केलेल्या उत्पादकाबाबत दाखविलेल्या आमिषाला सामान्य मनुष्य लगेच बळी पडतो, व फसवला जातो. मात्र आता अशा फसव्या जाहिरात करणाºया सेलिबे्रटींना तंबी बसणार असून कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
फसव्या आणि दिशाभूल करणाºया जाहिरातींसाठी कडक कायदा करण्याच्या तयारीत सरकार आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात करणाºया व्यक्तीला १० लाख रुपयाचा दंड किंंवा २ वर्षाला तुरूंगवास होऊ शकतो.
गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली तर थेट ५० लाख दंड आणि ५ वर्षाचा तुरुंगवास अशी दुहेरी शिक्षा करण्याचा विचार सुरू आहे. तेलगु देसम पार्टीचे खासदार जे.सी.दिवाकर रेड्डींच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने कडक शिफारशी सुचविल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी आम्रपाली बिल्डर्सकडून ग्राहकाची फसवणूक झाल्यानं बॅ्रंड अॅम्बेसॅडर महेंद्रसिंग धोनीवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. त्याानंतर बिल्डरशी बोलून आपण ग्राहकाला घर मिळवून देऊ असे आश्वासन धोनीने दिले होते. याप्रकरणात शाहरुखने धोनीची पाठराखण करून धोनीला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला होता.