VIDEO : सहकाऱ्य़ांसोबत एअरपोर्टवर होता सुपरस्टार विजय सेतुपति, अज्ञात व्यक्तीने अचानक केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:12 IST2021-11-04T15:11:08+5:302021-11-04T15:12:02+5:30

Vijay Sethupathi : विजय सेतुपति आपल्या सहकाऱ्यासोबत एअरपोर्टवर दिला. तो एअरपोर्टच्या प्रवेशद्वाराकडे जाताना दिसतोय, अशात अचानक एक व्यक्ती सिक्युरिटी ग्रुपवर उडी घेतो.

Tamil star Vijay Sethupathi's aide attacked by unknown person at airport watch video | VIDEO : सहकाऱ्य़ांसोबत एअरपोर्टवर होता सुपरस्टार विजय सेतुपति, अज्ञात व्यक्तीने अचानक केला हल्ला

VIDEO : सहकाऱ्य़ांसोबत एअरपोर्टवर होता सुपरस्टार विजय सेतुपति, अज्ञात व्यक्तीने अचानक केला हल्ला

तमिळ सिनेमांचा स्टार विजय सेतुपति (Vijay Sethipathi) आपल्या प्रत्येक भूमिकेने लोकांच्या मनात घर करतो. तो केवळ साऊथमधीलच प्रेक्षकांचा नाहीतर भारतातील प्रेक्षकांचा फेवरेट स्टार आहे. पण त्याच्यासोबत अशी घटना घडली की, त्याचे फॅन चिंतेत आहेत. त्याच्या सहकाऱ्यावर एका अनोळखी व्यक्तीने बंगळुरूच्या कॅम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका वादानंतर हल्ला केला. एका अज्ञात व्यक्तीने विजयच्या सहकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल

विजय सेतुपति आपल्या सहकाऱ्यासोबत एअरपोर्टवर दिला. तो एअरपोर्टच्या प्रवेशद्वाराकडे जाताना दिसतोय, अशात अचानक एक व्यक्ती सिक्युरिटी ग्रुपवर उडी घेतो. अशात विजय सेतुपतिला धक्का बसतो आणि अशात स्थितीची गंभीरता समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

 

काय आहे प्रकरण?

DNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, विजय सेतुतपि मंगळवारी रात्री शहरात एका सिनेमाच्या शूटींगवरून परत येत होता. तेव्हा त्याचा सहकारी त्याच्यासाठी मार्ग मोकळा करत होता. तेव्हा त्याने नशेत असलेल्या एका व्यक्तीला धक्का दिला. याच्याच रागातून त्या व्यक्तीने विजयच्या सहकाऱ्यावर हल्ला केला. एका मोठा वादानंतर, नशेत असलेल्या व्यक्तीत आणि सुरक्षा कर्मचारी व विजय सेतुपतिच्या सहकाऱ्यातील वाद मिटवण्यात आला. तसेच अधिकृत तक्रार दाखल न करण्याचा निर्णय झाला.
 

Web Title: Tamil star Vijay Sethupathi's aide attacked by unknown person at airport watch video