सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:50 IST2025-04-26T12:50:01+5:302025-04-26T12:50:30+5:30

ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'झापुक झुपूक' सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1 details | सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

'बिग बॉस मराठी' फेम आणि रीलस्टार सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'झापुक झुपूक' सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमासाठी चाहते उत्सुक होते. या सिनेमाच्या निमित्ताने सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

केदार शिंदेंनी 'बिग बॉस मराठी ५'च्या ग्रँड फिनालेला 'झापुक झुपूक'ची घोषणा केली होती. सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर सूरजच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. रिलीजआधीच 'झापुक झुपूक'मधील गाणीही सोशल मीडियावर ट्रेडिंग होती. अनेक रील व्हिडिओही व्हायरल झाले होते. या गाण्यांवर थिएटरमध्येही प्रेक्षक थिरकत असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांचं आणि सूरजच्या चाहत्यांचं प्रेम मिळत असलेल्या 'झापुक झुपूक' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २४ लाख रुपये इतकी कमाई केली आहे. आता विकेंडला सूरजचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 'झापुक झुपूक' कमाई करणार का, हे पाहावं लागेल. 


'झापुक झुपूक'मध्ये एक हटके लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकले आहेत. 

Web Title: suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1 details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.