लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:15 IST2025-12-01T18:12:35+5:302025-12-01T18:15:11+5:30
लग्नानंतर सूरज आणि संजना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या नवीन घरात गृहप्रवेश केला.

लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस' मराठी सिझन ५ चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला. सूरजने मैत्रीण संजना गोफणेशी लग्नगाठ बांधली. पुण्यातील सासवड येथे त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. सूरजच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेत. लग्नानंतर सूरज आणि संजना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या नवीन घरात गृहप्रवेश केला.
सूरज आणि संजनानं पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश केला. संजनाने सून म्हणून पहिल्यांदा घरात पाऊल ठेवतानाचे शुभ क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संजनाने तांदळानं भरलेल्या कलशाला हलके ढकलून घरात प्रवेश केला. तिच्यानंतर सुरजही घरात आला. या व्हिडीओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय. या सुंदर व्हिडीओवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन
दरम्यान, सूरज आणि संजना यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. परंपरेनुसार नवऱ्याने नवरीला उचलून पायऱ्या चढण्याची प्रथा आजही जेजुरीत पाळली जाते. ही प्रथा पाळत सूरजही संजनाला उचलून पायऱ्या चढला. सूरजची पत्नी संजना गोफणे ही त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज व संजनाचे हे लव्ह मॅरेज आहे, कारण ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. अखेर आता दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे.