Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:26 IST2026-01-03T11:24:34+5:302026-01-03T11:26:02+5:30
जैसलमेर येथे बीएसएफ सैनिकांच्या उपस्थितीत गाण्याच्या लाँचिंग वेळी सनी देओलला अश्रू अनावर झाले होते.

Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
सोनू निगमच्या आवाजातील 'संदेसे आते है' हे 'बॉर्डर' सिनेमातलं गाणं अजरामर आहे. १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'मध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते. आता २९ वर्षांनी 'बॉर्डर २' रिलीज होत आहे. यावेळी सिनेमात सनी देओलसोबत दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत. काल जैसलमेरमध्ये लौंगेवाला बॉर्डरवर भव्य इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी 'बॉर्डर २'चं 'घर कब आओगे' गाणं रिलीज करण्यात आलं. यावेळी सनी देओल भावुक झाला होता.
जैसलमेर येथे बीएसएफ सैनिकांच्या उपस्थितीत गाण्याच्या लाँचिंग वेळी सनी देओलला अश्रू अनावर झाले होते. भावुक होत त्याने सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या आवाजात वेदना स्पष्ट जाणवत होत्या. सर्वात आधी त्याने सर्व सैनिकांची विचारपूस केली.'कसे आहात तुम्ही? जेव्हापासून मी बॉर्डर सिनेमा केला तेव्हापासून मी तुमच्याच कुटुंबाचा भाग आहे. मी १९९७ साली बॉर्डर केला कारण मला माझ्या वडिलांचा 'हकिकत' सिनेमा खूप आवडला होता. त्यावेळी मी लहान होतो पण जेव्हा मी अभिनेता झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की मी सुद्धा माझ्या वडिलांलारखाच सिनेमा करेन."
तो पुढे म्हणाला, "मी जेपी दत्ता साहेबांशी बोललो आणि आम्ही दोघांनी या विषयावर सिनेमा बनवायचं ठरवलं. सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. मी आणखी जास्त बोलू शकत नाही, मेरा दिमाग हिला हुआ है." सनी देओल वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाला होता. याच कारणाने त्याने अशी प्रतिक्रिया दिली.
'बॉर्डर २' २३ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. अनुराग सिंह यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मोना सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.