Border 2: बॉक्स ऑफिसवर सनी देओलची गर्जना! 'बॉर्डर २'ची ३०० कोटींपर्यंत झेप, १५ दिवसांचं कलेक्शन समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:24 IST2026-02-07T15:24:30+5:302026-02-07T15:24:54+5:30
१५ दिवसांतच सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. आत्तापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

Border 2: बॉक्स ऑफिसवर सनी देओलची गर्जना! 'बॉर्डर २'ची ३०० कोटींपर्यंत झेप, १५ दिवसांचं कलेक्शन समोर
सनी देओलचा 'बॉर्डर २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच दमदार कमाई करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर २३ जानेवारीला प्रदर्शित झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'बॉर्डर २'चे शो हाऊसफूल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. १५ दिवसांतच सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. आत्तापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'बॉर्डर २'ने पहिल्याच दिवशी ३० कोटींचा बिजनेस केला. त्यानंतर पहिल्या वीकेंडला सिनेमाने ९० कोटींपर्यंत कमाई केली होती. मंडे टेस्टमध्येही सिनेमा पास झाला होता. पहिल्या सोमवारी या सिनेमाने ५९ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसत होतं. असं असलं तरी पुन्हा दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 'बॉर्डर २'ने ७० कोटींचा बिजनेस केला. तर शुक्रवारी म्हणजेच १५व्या दिवशी या सिनेमाने २.८५ कोटी कमावले आहेत. अशाप्रकारे आत्तापर्यंत 'बॉर्डर २'ने २९७ कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवलं असून वीकेंडला हा सिनेमा ३०० कोटी पार करेल.
'बॉर्डर २'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. ९०च्या दशकात गाजलेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं आहे. 'बॉर्डर २' नंतर मेकर्सने सिनेमाच्या पुढच्या भागाबाबतही हिंट दिली आहे.