सोनमच्या लग्नाच्या धामधुमीत श्रीदेवींचे हे व्हिडीओ झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 13:16 IST2018-05-02T13:15:56+5:302018-05-02T13:16:31+5:30

लग्नाच्या धामधुमीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीदेवी यांचे दोन व्हिडीओ सोशम मीडियात व्हायरल झाले आहेत.

Sridevi Viral Videos : Sridevi making fun of Janhvi Kapoors hindi and dancing on sonam kapoors song | सोनमच्या लग्नाच्या धामधुमीत श्रीदेवींचे हे व्हिडीओ झालेत व्हायरल

सोनमच्या लग्नाच्या धामधुमीत श्रीदेवींचे हे व्हिडीओ झालेत व्हायरल

मुंबई : एकीकडे अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या धामधुमीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीदेवी यांचे दोन व्हिडीओ सोशम मीडियात व्हायरल झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही सोनम कपूरच्या लग्नात आणि संगीत समारंभात श्रीदेवी यांच्या गाण्यांवर डान्स परफॉर्म करणार आहे. 

तेच दुसरीकडे श्रीदेवी यांचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्हिडीओत श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी यांचा डान्स आहे तर दुसऱ्या व्हिडीओत श्रीदेवी या जान्हवीच्या हिंदीची गंमत करताना दिसत आहेत.

 

Web Title: Sridevi Viral Videos : Sridevi making fun of Janhvi Kapoors hindi and dancing on sonam kapoors song