रॉकिंग स्टार यश येतोय! 'टॉक्सिक'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट, काऊंडाऊन सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:13 IST2025-10-31T08:57:25+5:302025-10-31T09:13:38+5:30
KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' कधी प्रदर्शित होणार?

रॉकिंग स्टार यश येतोय! 'टॉक्सिक'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट, काऊंडाऊन सुरु...
कन्नड स्टार यशच्या केजीएफ फ्रेंचायझीने जगभरात सिनेमा जगतात मोठा बेंचमार्क सेट केला. केजीएफ आणि केजीएफ २ चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यानंतर आता रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. यश बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'टॉक्सिक' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रसिद्ध फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी थेट निर्मात्यांशी संवाद साधून ही अफवा फेटाळून लावली आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत स्पष्ट केले की, "चित्रपट पुढे ढकलण्यात येणार नाही, फिल्म ठरल्या वेळेतच प्रदर्शित होणार आहे". प्रोडक्शन टीमशी बोलल्यानंतर तरण यांनी सांगितले की, चित्रपटाचे काम ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू आहे.
STOP THE RUMOURS... YASH'S NEXT FILM 'TOXIC' IS *NOT* DELAYED OR POSTPONED – 19 MARCH 2026 RELEASE CONFIRMED… Spoke to the producers – #Toxic is firmly on track for its [Thursday] 19 March 2026 release, perfectly timed for the festive weekend of #Ugadi, #GudiPadwa, and #Eid.… pic.twitter.com/bG1YsvdrQY
— taran adarsh (@taran_adarsh) October 30, 2025
शिवाय, फिल्मचे प्रोडक्शन हाऊस केव्हीएन प्रॉडक्शन्स यांनीही सोशल मीडियावर एक काउंटडाऊन पोस्ट टाकून या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे. एप्रिल महिन्यापासूनच पोस्ट-प्रोडक्शन आणि व्हीएफएक्स (VFX) चे काम सुरू झाले आहे. सध्या अंतिम शूट बेंगळुरूमध्ये सुरू आहे. तर सिनेमाचं प्रमोशन जानेवारी २०२६ पासून केलं जाईल. 'टॉक्सिक' चित्रपट १९ मार्च २०२६ रोजीच जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घालायला सज्ज आहे.
'टॉक्सिक'ची  खास गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेची व्याप्ती फक्त पॅन इंडिया नाही तर जागतिक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.  हा चित्रपट इंग्रजी तसेच भारताच्या वेगवेगळ्या भाषांत डब केला जाईल. त्यामुळेच हा चित्रपट फक्त पॅन इंडिया नव्हे तर पॅन वर्ल्ड ठरणार आहे.  'केजीएफ' नंतर मोठ्या पडद्यावर यशच्या या 'कमबॅक'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याशिवाय, यश नितेश तिवारीच्या 'रामायण' मध्ये देखील काम करतोय, ज्यामध्ये तो रणबीर कपूर आणि साई पल्लवीसोबत दिसेल. 
 
