Video: पत्नीला अखेरचा निरोप देताना विजय राघवेंद्र गहिवरला, 'केजीएफ' स्टार यशने दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:37 IST2023-08-10T13:35:07+5:302023-08-10T13:37:17+5:30

सोशल मीडियावर विजय राघवेंद्रचा व्हिडिओ समोर आला आहे

vijay raghvendra wife spandana last rites kgf star yash consoled actor | Video: पत्नीला अखेरचा निरोप देताना विजय राघवेंद्र गहिवरला, 'केजीएफ' स्टार यशने दिला धीर

Video: पत्नीला अखेरचा निरोप देताना विजय राघवेंद्र गहिवरला, 'केजीएफ' स्टार यशने दिला धीर

कन्नड अभिनेता विजय राघवेंद्र (Vijay Raghavendra) यांच्या पत्नीचं काल बँकॉक येथे निधन झालं. कुटुंबासोबत सुट्टी घालवत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला. विजय राघवेंद्र आणि पत्नी स्पंदना यांना एक मुलगा आहे. स्पंदना यांच्या मृत्यूने बापलेकावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्पंदना यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. पत्नीला अखेरचा निरोप देताना अभिनेता विजय पूर्णपणे कोसळला. त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. केजीएफ स्टार अभिनेता यशने (Yash) विजयेंद्रला धीर देत शांत केले.

सोशल मीडियावर विजय राघवेंद्रचा व्हिडिओ समोर आला आहे. पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता ढसाढसा रडत आहे तर यश त्याला धीर देताना दिसत आहे. खूपच भावूक करणारा हा क्षण आहे. चाहत्यांनीही या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. सर्वच विजयला धीर देत आहेत. इंडस्ट्रीतील इतरही काही कलाकारांनी अंत्यदर्शन घेतले. 

विजय आणि स्पंदना 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. याच महिन्यात त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस होता. यासाठीच विजय पत्नी आणि मुलासह बँकॉकला सेलिब्रेट करण्यासाठी गेला होता. मात्र लग्नाच्या वाढदिवसाच्या १९ दिवस आधीच स्पंदनाने जगाचा निरोप घेतला. 

विजयची पत्नी स्पंदनाने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. रविचंद्रन यांच्या 'अपूर्वा' सिनेमात तिने कॅमिओ केला होता. विजय आणि स्पंदनाचं 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना शौर्य हा मुलगा झाला. विजय कन्नड सिनेमातील सुपरस्टार आहे. 'चिन्नारी मुथा' सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याला खूप पसंत केले गेले. विजयला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 

Web Title: vijay raghvendra wife spandana last rites kgf star yash consoled actor