'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:10 IST2024-12-09T13:10:15+5:302024-12-09T13:10:51+5:30
'पुष्पा - द रुल'नंतर रश्मिकाचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
Rashmika Mandanna Next Film The Girlfriend : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा - द रुल' (Pushpa-The Rule) प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा तीच्या श्रीवल्लीच्या भुमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे. आता 'पुष्पा - द रुल'नंतर रश्मिकाचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'पुष्पा 2' नंतर रश्मिका 'द गर्लफ्रेंड' या सिनेमात झळकणार आहे. रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट राहुल रवींद्रन दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे रश्मिकाच्या कारकिर्दीतील हा पहिला सिंगल लीड चित्रपट आहे.
'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटात ती एका लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द गर्लफ्रेंड'नंतर रश्मिकाचा 'छावा' सिनेमा येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रश्मिका आयुष्मान खुरानासोबत 'थामा' या हॉरर कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. तसेच साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली बनत असलेल्या सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटातही ती झळकणार आहे.