'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 08:01 PM2024-04-08T20:01:00+5:302024-04-08T20:01:00+5:30

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाच्या टीमने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतलीय.असं काय घडलं जाणून घ्या

Vijay Deverakonda team files a police complaint on those trolling movie Family Star | 'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडा हा सर्वांचा आवडता अभिनेता. विजयला आपण अनेक सिनेमांमधून विविध भूमिका करताना पाहिलंय. विजयचा नवीन सिनेमा 'फॅमिली स्टार' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात विजयसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही झळकत आहे. अशातच सिनेमा रिलीज होऊन काही दिवस उलटले असताना विजयच्या टीमने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

विजय देवरकोंडाच्या टीमने ट्विट करून विजय आणि त्याच्या सिनेमाला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची माहिती दिली आहे. विजयच्या टीमने केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. खोट्या अफवा पसरवून बनावट ID वापरणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. विजयच्या 'फॅमिली स्टार'बद्दल नकारात्मक गोष्टी पसरवल्याने चित्रपटाच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होतोय, असं विजयच्या टीमचं म्हणणं आहे.

एका टीव्ही चॅनलशी बोलताना 'फॅमिली स्टार'चे निर्माते दिल राजू म्हणाले की, "सोशल मीडियावर ट्रोल होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.  ‘फॅमिली स्टार’ हा कौटुंबिक चित्रपट आहे. लोकांना चित्रपट आवडला. आम्ही एक चांगला चित्रपट बनवला. चांगला चित्रपट असूनही त्याबद्दल चुकीच्या गोष्टी का पसरवल्या जात आहेत? असा सवाल निर्मात्यांनी केलाय. 

'फॅमिली स्टार'चा टीझर रिलीज झाल्यापासून काही लोकं या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याचे लग्न मोठ्या थाटामाटात  पार पडल्याचं दिसतं. चित्रपटातील या दृश्याबाबत इंटरनेटवर अनेक मीम्स आणि रील्स बनवण्यात आले आहेत. या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चित्रपटाचं बरंच नुकसान झाल्याचं निर्मात्यांना वाटतंय. आता पोलीस ट्रोल करणाऱ्या माणसांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: Vijay Deverakonda team files a police complaint on those trolling movie Family Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.