रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:35 IST2026-01-05T13:34:36+5:302026-01-05T13:35:31+5:30
विजय-रश्मिका कॅमेऱ्यासमोर एकत्रच आले, लग्नाच्या चर्चा कन्फर्म?

रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री
मनोरंजनविश्वातील सध्याचं सर्वात चर्चेतलं कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. 'गीता गोंविंदम','डिअर कॉम्रेड' सारख्या हिट सिनेमांमध्ये ते दिसले. विजय आणि रश्मिका पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र कधीच त्यांनी जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. नुकतंच दोघांनी रोममध्ये नवीन वर्षाची सुरुवात केली. रोममध्ये सुट्टी एन्जॉय करुन ते भारतात परतले. विमानतळावर पहिल्यांदाच दोघं एकत्र दिसले.
विजय आणि रश्मिका याआधीही अनेकदा एकत्र व्हेकेशनवर गेले आहेत. मात्र त्यांनी कधीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले नव्हते. आता पहिल्यांदाच विजयच्या फोटोंमध्ये रश्मिकाची झलक दिसली. तसंच इतर वेळी व्हेकेशनवर जाताना ते वेगवेगळ्या वेळी विमानतळावर यायचे. तेच आता पहिल्यांदाच दोघं एकमेकांसोबतच विमानतळावर आले आहेत. रश्मिका शर्टस ब्लॅक जॅकेट आणि ग्रे पलाजो अशआ कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तर विजय ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. दोघांनी चेहऱ्याला मास्क लावला आहे.विमानतळावरील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओवरुन दोघांच्या लग्नाच्या चर्चा कन्फर्म असल्याचंच दिसत आहे. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोघं लग्न करणार आहेत. दरम्यान दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अद्याप यावर ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही. तरी विजय आणि रश्मिकाला न्यूली वेड कपलच्या वेषात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
रश्मिका मंदानाने नुकताच 'द गर्लफ्रेंड हा हिट सिनेमा दिला. सध्या ती 'कॉकटेल २'च्या शूटमध्ये व्यग्र आहे. तर विजय देवरकोंडा 'द किंगडम'मध्ये दिसला. त्याचा हा सिनेमा फारसा चालला नाही. आता तो 'राउडी जनार्धना'मध्ये दिसणार आहे.