रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:06 IST2026-01-01T12:05:29+5:302026-01-01T12:06:14+5:30
विजय देवरकोंका आणि रश्मिका मंदाना नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत

रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
विजय देवरकोंका आणि रश्मिका मंदाना नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघांनीही आजपर्यंत एकमेकांवरील प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. मात्र चाहत्यांनी अनेकदा त्यांना एकत्र पाहिलं. कधी डिनर डेट तर कधी व्हेकेशनवर दोघं एकत्र असल्याचं चाहत्यांनी पाहिलं. दरम्यान आता पहिल्यांदाच विजयने त्याच्यासोबत रश्मिकाचीही झलक दाखवणारा फोटो शेअर केला आहे.
नवीन वर्षानिमित्त विजय देवरकोंडा, त्याचा भाऊ आनंद देवरकोंडा आणि काही मित्र रोममध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे रश्मिका मंदानाही त्यांच्यासोबत रोममध्ये आहे. रश्मिकाने आधी शेअर केलेल्या फोटो अल्बममध्ये विजयचा भाऊ दिसतोय. तर आता कालच विजयनेही रोममध्ये फिरतानाचे काही फोटो पोस्ट केले. यामध्ये रश्मिकासोबतचेही फोटो आहेत. रश्मिका विजयला मागून मिठी मारतानाही हा फोटो आहे. ज्यात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही पण चाहत्यांची नजर लगेच तिकडे गेली. आणखी एका फोटोत विजयच्या बाजूला रश्मिका दिसते जिथे फोटो कट झाला आहे.
विजयने पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्या प्रिय मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण एकत्र पुढे जात राहू, अनेक आठवणी बनवत राहू, चांगलं काम करत राहू, प्रेम पसरवत राहू आणि आयुष्याचा आनंद घेत राहू. सर्वांना खूप प्रेम."
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने ऑक्टोबर २०२५ मध्येच जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. तर आता फेब्रुवारी महिन्यात दोघंही उदयपूरमधील एका पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.