Varanasi Movie: सगळंच भव्य दिव्य अन् डोळे दिपवणारं! राजामौलींनी सेटवर निर्माण केलं खरंखुरं वाराणसी शहर; फोटो पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:32 IST2026-03-25T11:31:58+5:302026-03-25T11:32:21+5:30
राजामौलींच्या या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत.

Varanasi Movie: सगळंच भव्य दिव्य अन् डोळे दिपवणारं! राजामौलींनी सेटवर निर्माण केलं खरंखुरं वाराणसी शहर; फोटो पाहून चाहते थक्क
सुप्रसिद्ध साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली बिग बजेट सिनेमांसाठी ओळखले जातात. बाहुबली, आरआरआर, हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते. राजामौली आता 'वाराणसी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'वाराणसी' या सिनेमाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत. या सिनेमात महेश बाबू मुख्य भूमिकेत असून देसी गर्ल प्रियांका चोप्राही दिसणार आहे. राजामौलींच्या या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत.
वाराणसी सिनेमाच्या एका इव्हेंटला राजामौली यांनी काही इंटरनॅशनल मीडियालाही आमंत्रित केलं होतं. या इव्हेंटला महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारनही उपस्थित होते. यावेळी राजामौलींनी त्यांच्या सिनेमाच्या सेटची झलक परदेशातील मीडियाला दाखवली होती. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 'वाराणसी' सिनेमासाठी राजामौलींनी वाराणसी हे शहरच रिक्रिएट केल्याचं दिसत आहे. मोठमोठी मंदिर आणि आलिशान असं शहराचं स्वरुप दाखवण्यात आलं आहे. 'वाराणसी'चा भव्य दिव्य आणि डोळे दिपावणारा सेट पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

'वाराणसी' सिनेमात महेश बाबू, प्रियांका चोप्रा, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत. महेश बाबू सिनेमात रुद्र आणि श्रीराम अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर प्रियांका मंदाकिनीच्या भूमिकेत आहे. 'वाराणसी' सिनेमाची कथा टाइम ट्रॅव्हलवर आधारित आहे. पौराणिक कथा आणि मॉर्डन अॅक्शन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं बजेट १४०० कोटी इतकं आहे. ७ एप्रिल २०२७ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.