तृषा कृष्णनने मंसूर अली खानच्या माफीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- चुका करणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:21 IST2023-11-25T11:15:44+5:302023-11-25T11:21:36+5:30

वाद वाढल्यानंतर मंसूरने तृषाची माफी मागितली असून आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Trisha Krishnan reacts to Mansoor Ali Khan's apology, says- Making a mistake... | तृषा कृष्णनने मंसूर अली खानच्या माफीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- चुका करणं...

तृषा कृष्णनने मंसूर अली खानच्या माफीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- चुका करणं...

काही दिवसांपूर्वी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेते मंसूर अली खानने अभिनेत्री  तृषाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता. वाद वाढल्यानंतर मंसूरने तृषाची माफी मागितली असून आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 थलापती विजयच्या 'लिओ' सिनेमात मंसूर अली खान आणि तृषाही झळकले आहेत. यामध्ये तृषाबरोबर एक सीन करण्याबाबत मंसूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही.  परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही", असं मंसूर अली खान म्हणाला होता.

रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, मंसूर अली खानने एक स्टेटमेंट जारी करून तृषाची माफी मागितली आहे. मन्सूर म्हणाला, ''माझी सहकलाकार तृषा,  मला माफ करा. देव मला तुझ्या लग्नाला आशीर्वाद देण्याची संधी देऊ दे.''

मंसूर अली खान यांच्या माफीनाम्यावर तृषा कृष्णनने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून मन्सूरच्या माफीच्या विधानाला उत्तर दिले. अभिनेत्रीने लिहिले की, "चुका करणे हा मानवी स्वभाव आहे आणि क्षमा करणे हा दैवी गुण  आहे." तृषा कृष्णनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
 

Web Title: Trisha Krishnan reacts to Mansoor Ali Khan's apology, says- Making a mistake...