थिएटर गाजवलं, आता OTT वर प्रदर्शित होताच ट्रेडिंगमध्ये, कोणता आहे 'हा' सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:35 IST2025-06-03T15:34:46+5:302025-06-03T15:35:01+5:30
या चित्रपटाचं कथानकानं प्रेक्षकांवर भूरळ घातली.

थिएटर गाजवलं, आता OTT वर प्रदर्शित होताच ट्रेडिंगमध्ये, कोणता आहे 'हा' सिनेमा?
OTT Most Trending Blockbuster Movie: तुम्हाला ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज व शो पाहायला आवडत असतील तर एक चित्रपट अजिबात चुकवू नका. या चित्रपटामध्ये एक दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. थिएटरनंतर हा चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंड करतोय. तब्बल ९० कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर २३६.८१ कमावले आहेत. तर कोणता आहे हा चित्रपट? जाणून घेऊयात.
२ तास ४३ मिनिटांच्या या चित्रपटाने एका महिन्याहून अधिक काळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय. या अॅक्शन क्राइम थ्रिलर चित्रपटाचं नाव 'थुडारम' आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. २०२५ च्या हिट चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे. थरुन मूर्ती दिग्दर्शित या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत.
मल्याळम चित्रपट त्याच्या मजबूत कथानकांसाठी आणि वास्तववादी पात्रांसाठी ओळखले जातात. या चित्रपटाची कथा पाहून तुमचं डोकं चक्रावेल. सुरुवातीच्या क्षणापासून ते क्लायमॅक्सपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.
कुठे पाहाल?
बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केल्यानंतर, हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर येताच या चित्रपटानं टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलंय.
आयएमडीबीवर 'थुडारम'ला ७.९ रेटिंग मिळालं आहे.