या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:02 IST2025-12-12T13:00:54+5:302025-12-12T13:02:43+5:30
या अभिनेत्रीचे वडील २००७ मध्ये उरी येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. त्यांचे वडील देशाचा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान, अशोक चक्र मिळवणारे पहिले व्यक्ती होते. याच वर्षी या अभिनेत्रीने ८०० कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन खळबळ माजवली.

या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
दाक्षिणात्य या अभिनेत्रीने 'कांतारा'मध्ये तिच्या अभिनयाने खूप प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते. तिने घोडेस्वारी, शास्त्रीय नृत्य आणि तलवारबाजी देखील शिकली. आपल्या करिअरमध्ये या अभिनेत्रीने अनेक चित्रपट केले, परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने जगभरात ८५१.८९ कोटी रुपयांची कमाई करून खळबळ माजवली होती. जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे? तिचे वडील भारतीय सैन्यात कर्नल होते आणि उरी हल्ल्यात शहीद झाले होते.
या अभिनेत्रीने कन्नड व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०१९ मध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली. नुकतीच ती 'कांतारा: चॅप्टर वन'मध्ये दिसली, जो २ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट या अभिनेत्रीच्या करिअरमधील सर्वाधीक कमाई करणारा आणि सुपरहिट चित्रपट ठरला आहे. ही अभिनेत्री आहे रुक्मिणी वसंत, जी ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर वन' मध्ये राजकुमारी कनकवतीच्या भूमिकेत दिसली आणि खूप गाजली. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
रुक्मिणी वसंतने २०१९ मध्ये 'बीरबल' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. पण तिच्या करिअरमधील खरा बदल २०२३ मध्ये आलेल्या 'सप्त सागरदाचे एल्लो' या चित्रपटातून आला, ज्यासाठी रुक्मिणी वसंतने कन्नडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर क्रिटिक अवॉर्ड जिंकला.
रुक्मिणीचे वडील २००७ मध्ये झाले शहीद
रुक्मिणी वसंतचा जन्म १० डिसेंबर १९९६ रोजी बंगळूरू येथील एका कन्नड कुटुंबात झाला. तिचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे भारतीय सैन्यात होते. २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे भारत-पाकिस्तान सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते. त्यांना मरणोपरांत देशाचा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारे ते कर्नाटकचे पहिले व्यक्ती होते.
यशच्या 'टॉक्सिक'मध्ये दिसणार रुक्मिणी वसंत
रुक्मिणी वसंत आता यश अभिनित 'टॉक्सिक'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी दोन भाषांमध्ये - कन्नड आणि इंग्रजीमध्ये तयार होत आहे. या चित्रपटात यश आणि रुक्मिणी वसंत यांच्याशिवाय नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय आणि सदेव नायर हे देखील आहेत. 'टॉक्सिक'चे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होईल.