'सासरा-जावई' म्हणून नातं संपलं, पण आदर कायम! रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:54 IST2025-12-12T15:51:00+5:302025-12-12T15:54:26+5:30
लेकीसोबतचा संसार मोडला पण सासऱ्यांवरचं प्रेम कायम, रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट

'सासरा-जावई' म्हणून नातं संपलं, पण आदर कायम! रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट
सुपरस्टार रजनीकांत हे दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज १२ डिसेंबर रोजी रजनीकांत आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी देशभरातील चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रजनीकांत यांच्यासाठी धनुषने खास पोस्ट शेअर केली आहे. धनुष हा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचा पूर्वाश्रमीचा नवरा आहे. 'सासरा-जावई' हे नातं संपुष्टात आलेलं असलं तरी रजनीकांत यांच्याप्रती धनुषच्या मनात असलेला आदर मात्र टिकून असल्याचं दिसलं.
धनुषने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने "हॅपी बर्थडे थलैवा" असं लिहलं. त्यासोबत हार्ट इमोजी आणि हात जोडण्याची इमोजी वापरून रजनीकांत यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं.
Happy birthday thalaiva 🙏🙏🤩🤩😎😎❤️❤️ @rajinikanth
— Dhanush (@dhanushkraja) December 11, 2025
२००४ मध्ये धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांच्याशी विवाह केला होता. त्यावेळी धनुषचं वय केवळ २१ वर्षं होतं. ऐश्वर्या धनुषपेक्षा २ वर्षांनी मोठी होती. दोघांनी १८ वर्ष संसार केला. परंतु १८ वर्षांच्या संसारानंतर २०२४ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत.