आर.माधवन सोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं ६४ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 19:30 IST2024-04-03T19:30:00+5:302024-04-03T19:30:00+5:30
आर.माधवन, सूर्या अशा लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालंय

आर.माधवन सोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं ६४ व्या वर्षी निधन
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. आर.माधवन, सुर्या अशा लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलेले प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विश्वेश्वर राव यांचं निधन झालंय. चेन्नईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये विश्वेश्वर यांनी २ एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरमुळे विश्वेश्वर यांचं निधन झालंय. विश्वेश्वर यांनी २०० हून अधिक तामिळ सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली.
वयाच्या ६ व्या वर्षीच विश्वेश्वर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 'पीथगमन' या सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सिनेमात साऊथ सुपरस्टार विक्रम झळकला होता. विश्वेश्वर यांनी साकारलेली लैलाच्या वडिलांची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय त्यांनी आर. माधवनच्या 'इवानो ओरुवन' सिनेमात अभिनय केला आहे.
#Tamil actor #VisheshwaraRao dies at 64 in Chennai hospital after battling cancer. #RIPVisheswaraRaohttps://t.co/ZuMycKmOS1
— HT City (@htcity) April 3, 2024
तामिळ फिल्मस् आणि टीव्ही सिरीयल्समधील अनेक अभिनेत्यांनी विश्वेश्वर राव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सहाय्यक भूमिका आणि विनोदी भूमिकांमुळे विश्वेश्वर राव यांना मनोरंजन विश्वात ओळख मिळाली. त्यांनी तब्बल २५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तामिळ मनोरंजन विश्वातील एक हरहुन्नरी आणि जाणकार अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.