सगळ्यात महागडा घटस्फोट! थलपति विजय बायकोला पोटगी म्हणून देणार तब्बल २५० कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:56 IST2026-03-04T15:56:18+5:302026-03-04T15:56:46+5:30
थलपति विजयच्या सुखी संसारात वादळ आलं असून २७ वर्षांनी तो पत्नीपासून वेगळं होणार आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. थलपति विजय बायकोला तब्बल २५० कोटी इतकी रक्कम पोटगी म्हणून देण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे.

सगळ्यात महागडा घटस्फोट! थलपति विजय बायकोला पोटगी म्हणून देणार तब्बल २५० कोटी?
साऊथ सुपरस्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहेत. थलपति विजयच्या सुखी संसारात वादळ आलं असून २७ वर्षांनी तो पत्नीपासून वेगळं होणार आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. विजयचे साऊथ अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्तीने केला आहे. थलपति विजय बायकोला तब्बल २५० कोटी इतकी रक्कम पोटगी म्हणून देण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे.
फिल्मीबीट या तमिळच्या वृत्तानुसार, थलपति विजयने न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी आणि त्वरित घटस्फोट घेण्यासाठी तोडगा काढला आहे. विजयने त्याच्या पत्नीला २५० कोटींच्या पोटगीची ऑफर दिल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळण्याच्या दृष्टीने अभिनेत्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून थलपति विजय आणि त्याची पत्नी संगीता वेगळे राहत आहेत. पोटगीची रक्कम ही संगीता आणि त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी देण्यात येत असल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र अद्याप यावर थलपति विजयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
थलपति विजय आणि संगीता यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न करत संसार थाटला होता. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी हिंदू विधींनुसार पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. मात्र आता त्यांचा २७ वर्षांचा संसार मोडला आहे. थलपति विजयचं नाव अभिनेत्री तृषा क्रिष्णनसोबत जोडलं जात आहे.