वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळताच थलपति विजयच्या लेकाचा मोठा निर्णय, स्वत:च्या नावात केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:53 IST2026-03-14T11:52:40+5:302026-03-14T11:53:37+5:30
थलपति विजयच्या विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या निर्णयानंतर अभिनेत्याच्या मुलाने मोठा निर्णय घेतला आहे. थलपति विजयच्या मुलाने स्वत:च्या नावातून अभिनेत्याचं नाव काढून टाकलं आहे.

वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळताच थलपति विजयच्या लेकाचा मोठा निर्णय, स्वत:च्या नावात केला बदल
साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने त्याच्यावर एक्स्ट्रा मरेटिअल अफेअरचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचा २७ वर्षांचा संसार मोडणार आहे. थलपति विजयच्या विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या निर्णयानंतर अभिनेत्याच्या मुलाने मोठा निर्णय घेतला आहे. थलपति विजयच्या मुलाने स्वत:च्या नावातून अभिनेत्याचं नाव काढून टाकलं आहे.
थलपति विजयचा मुलगा जेसन संजय हा संदीप किशन यांच्या सिग्मा या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये जेसन संजयचं नावही दिसत आहे. पण त्याच्या नावापुढे थलपति विजयचं नाव दिसत नाही. साऊथमध्ये आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव लावण्याची परंपरा आहे. मात्र थलपति विजयच्या लेकाने अभिनेत्याचं नाव न लावता त्याच्या आईच्या नावाचं पहिलं अक्षर नावापुढे जोडलं आहे. टीझरमध्ये 'जेसन संजय एस' असं नाव थलपति विजयच्या लेकाचं दिसत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. एवढंच नव्हे तर जेसन संजयने थलपति विजयला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचंही म्हटलं जात आहे.
थलपति विजय आणि संगीता यांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. थलपति विजयचं नाव साऊथ ब्युटी तृषा क्रिष्णनसोबत जोडलं जात आहे. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच एका लग्नात ते दोघे एकत्र दिसले होते. थलपति विजयने अभिनयातून संन्यास घेतला असून आता तो पूर्णवेळ राजकारणात सक्रिय झाला आहे.