Globetrotter Event: ५० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने राजामौलींच्या आगामी सिनेमाची घोषणा होणार; प्रियंका चोप्राही उपस्थित राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:41 IST2025-11-11T12:36:45+5:302025-11-11T12:41:53+5:30
राजमौली, महेश बाबू, प्रियंका चोप्रा यांच्या आगामी सिनेमाची घोषणा होणार असून सर्वांचा याची उत्सुकता आहे

Globetrotter Event: ५० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने राजामौलींच्या आगामी सिनेमाची घोषणा होणार; प्रियंका चोप्राही उपस्थित राहणार?
प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) हे त्यांच्या चित्रपटांच्या भव्यतेसाठी आणि अप्रतिम कथेसाठी जगभर ओळखले जातात. 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारख्या चित्रपटांनी जागतिक स्तरावर यश मिळवल्यानंतर, आता त्यांच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट अभिनेता महेश बाबू सोबतचा असून याचं सध्या नाव 'एसएसएमबी २९' (SSMB29) असं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजामौली मोठा इव्हेंट करण्याच्या तयारीत आहेत.
राजामौली या चित्रपटाचे प्रमोशन अत्यंत मोठ्या प्रमाणावर करण्याचा विचार करत आहेत. माहितीनुसार, त्यांनी हैदराबादमध्ये एका ग्रँड इव्हेंटचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. या इव्हेंटला त्यांनी 'ग्रँड ग्लोबट्रॉटर इव्हेंट' असं नाव दिलं आहे. या कार्यक्रमात जवळपास ५०,००० चाहत्यांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. राजामौली आणि त्यांच्या सिनेमाची लोकप्रियता पाहता हे आयोजन केवळ देशात नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चर्चेत राहील, अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमात विशेष व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भव्य सेटअप असणार आहे. १५ नोव्हेंबरला हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये हा इव्हेंट असणार आहे.
'एसएसएमबी २९' हा चित्रपट एका जागतिक ॲक्शन-ॲडव्हेंचर कथेवर आधारित असेल. हॉलिवूडमधील प्रसिद्ध 'इंडियाना जोन्स' मालिकेपासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार केला जात आहे.राजामौली नेहमीच त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनोख्या पद्धतींचा वापर करतात. 'एसएसएमबी २९' हा त्यांचा आणखी एक जागतिक स्तरावर प्रदर्शित होणारा चित्रपट असल्याने, या 'ग्लोबट्रॉटर' इव्हेंटद्वारे ते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड उत्साह आणि चर्चा निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. महेश बाबू आणि राजामौली यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रा झळकणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी प्रियंकाला भारतीय चित्रपटात पाहायला चाहते उत्सुक आहेत.