पत्नीसोबत स्टेजवर थिरकले एस.एस. राजमौली, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:34 IST2024-12-15T16:34:48+5:302024-12-15T16:34:58+5:30
राजमौली पत्नीसोबत चक्क डान्सचा आनंद घेत आहे.

पत्नीसोबत स्टेजवर थिरकले एस.एस. राजमौली, Video व्हायरल
एस.एस. राजमौली ( SS Rajamouli ) हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिभाशाली दिग्दर्शक आहेत. 'आरआरआर' आणि 'बाहुबली' सारखे मास्टरपीस चित्रपट देणारे एस.एस. राजमौली यांचं नाव जगभरातून अभिमानानं घेतलं जातं आहे. त्यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याला नामांकित गोल्डन ग्लोब या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशातच शांत स्वभावाच्या राजामौलींची एक वेगळी बाजू दिसून आली आहे. सध्या राजामौलींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये राजमौली पत्नीसोबत चक्क डान्सचा आनंद घेत आहे.
एका प्री-वेडिंग सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. एस.एस. राजमौली यांनी पुतण्या श्री सिंहाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात पत्नी रमासोबत स्टेजवर ठेका धरला आहे. यावेळी पत्नीनेही त्यांना उत्तम साथ दिली आहे. राजमौली आणि रमा हे रवि तेजा आणि असिन यांच्या Amma Nanna O Tamila Ammai चित्रपटातील सुपरहिट गाणं Lunchkostava वर डान्स करताना पाहायला मिळाले. त्यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहतेही खूश झाले आहेत.
राजामौली आणि रमा यांच्यातील बॉन्डिंग या डान्समध्ये दिसून आलं आहे. राजामौलींचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.राजामौली यांनी २००१ साली रमा यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत. दोघांचं एकमेंकावर खूप प्रेम आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच विशेष आहे.
राजमौली यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरच दाक्षिणात्या सुपरस्टार महेश बाबूसोबत SSMB29 हा चित्रपट करणार आहे. तसेच त्यांच्या 'बाहुबली : द कन्क्लुजन; 'बाहुबली : द बिगिनींग' अशा दोन भागांनी बॉक्सऑफिसवरही एकापेक्षा एक रेकॉर्ड रचले. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा सुरु आहे.