अदिवि शेषनं कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या छोट्या चाहतीचे स्वप्न 'असं' केलं पूर्ण, अन् बनला रिअल 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 10:19 IST2024-07-21T10:18:16+5:302024-07-21T10:19:33+5:30

अदिवि शेष नेहमीच आपल्या सोशल वर्कमुळे चर्चेत असतो.

South Superstar Adivi Sesh fulfills the dream of his little fan who is battling cancer Won The Hearts Of All | अदिवि शेषनं कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या छोट्या चाहतीचे स्वप्न 'असं' केलं पूर्ण, अन् बनला रिअल 'हिरो'

अदिवि शेषनं कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या छोट्या चाहतीचे स्वप्न 'असं' केलं पूर्ण, अन् बनला रिअल 'हिरो'

साऊथ सुपरस्टार अदिवि शेष (Adivi Sesh) हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अदिवि शेष नेहमीच आपल्या सोशल वर्कमुळे चर्चेत असतो. आता साऊथ सुपरस्टारनं नुकतंच कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका मुलीची भेट घेतली आणि तिच्यासोबत संपूर्ण दिवस घालावला. त्याच्या या कृतीने सर्वांचेच मन जिंकले आहे. 

इंडस्ट्रीतील जवळच्या व्यक्तीकडून आपल्या छोट्या फॅनबद्दल कळताच अदिवि शेषने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोघांची भेट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून झाली. यानंतर अभिनेत्याने  चिमुकलीला सरप्राईज देण्याचं ठरवलं. तिच्या कुटुंबाला त्याने एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि तिला सरप्राईज केलं. आपला लाडका हिरो अदिवि शेषला समोर पाहताच तिच्या तर आनंदालाच पारावर राहिला नाही. 

अदिवि शेष वयाचं भान विसरून या मुलीसोबत मनमोकळेपणाने खेळला अन् ते क्षण जगालाही. तो तिच्यासोबत खेळण्यात आणि गप्पा मारण्यात दंग झाल्याचं दिसून आलं.  आयुष्य हे एकदाच मिळतं आणि ते मनभरून जगावं, असं म्हटलं जातं. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या चिमुकलीने आपला एक दिवस मनभरून शेषसोबत जगला.अभिनेत्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'हा क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही'. 

अदिवि शेष हा या छोट्या चाहतीच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे आणि गरज पडल्यास आवर्जून सांगा असं देखील त्याने तिच्या कुटुंबाला सांगितलं आहे.  एवढंच नाही तर जेव्हा हैदराबादला ती पुढील उपचारासाठी येईल, तेव्हा तिची भेट घेण्याचे आश्वासनही शेषनं दिलं आहे.  फक्त पडडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही शेष हा 'हिरो' आहे असंच म्हणावे लागेल. चिमुकलीची इच्छा पूर्ण करत त्याने माणुसकीचं सुंदर दर्शन घडवलं आहे. 

अदिवी शेष हा साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठा स्टार आहेत. 'बाहुबली' चित्रपटात त्याने भल्लादेवच्या मुलाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली होती.  रिअल लाईफ हिरो 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन के यांच्या आयुष्यावरच्या 'मेजर'  या चित्रपटात त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचं जबरदस्त कौतुक झालं होतं. अदिवी शेष हा त्‍याच्‍या हँन्डसम लूक आणि अभिनयामुळे चाहत्‍यांचा लाडका आहे.  

Web Title: South Superstar Adivi Sesh fulfills the dream of his little fan who is battling cancer Won The Hearts Of All