कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 10:59 IST2026-02-01T10:48:22+5:302026-02-01T10:59:03+5:30
धक्कादायक! फोटोग्राफरने प्रसिद्ध अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी, 'त्या' प्रसंगाबद्दल म्हणाली...

कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं होतं?
South Actress Aishwarya Rajesh: अभिनयाचं क्षेत्र दिसायला जरी ग्लॅमरस असलं तरी पडद्यामागचं वास्तव भीषण आहे. मनोरंजनविश्वात काम करताना अनेकदा कास्टिंग काऊससारखे अनेक विचित्र प्रकार समोर येतात. तर बऱ्याचदा कलाकारांना चांगल्या-वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं. अभिनय क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांबद्दल खुलासा केला. असाच काहीसा प्रकार एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला.
एका मुलाखतीत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या राजेशने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या वाईट अनुभवाविषयी पहिल्यांदाच खुलासा केला आहे. यावेळी अभिनेत्रीने असंही सांगितलं की, एका फोटोशूटदरम्यान, तिला खूप वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला होता. मात्र, मोठ्या हुशारीने अभिनेत्रीने त्या फोटोग्राफरचा हा डाव उधळून लावला. निखिल विजेयेंद्र सिम्हा यांच्या पॉडकास्टमध्ये तो अनुभव सांगत ऐश्वर्या म्हणाली, "त्यावेळी मी खूपच लहान होते आणि माझ्याभावासोबत एका फोटोशूटसाठी गेले होते. तिथे असलेल्या एका फोटोग्राफरने मला काही वेळ बाहेर थांबायला सांगितलं. तेव्हा त्याने विचित्र मागणी केली. मला तुझं शरीर पाहायचं आहे, असं तो म्हणाला. त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं." असं अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं. परंतु, हुशारीनं अभिनेत्री खोलीच्या बाहेर आली.
यानंतर पुढे ती म्हणाली, "त्या घटनेनंतर मला धक्काच बसला. कित्येक मुलींना याचा सामना करावा लागत असेल. मी आजवर या घटनेबद्दल माझ्या भावासोबत बोलले नाही."
दिग्दर्शकाच्या बोलण्याने दुखावलेली अभिनेत्री
तो प्रसंग शेअर करत अभिनेत्रीने सांगितलं, एका शूटसाठी काही मिनिटे उशिरा आल्याबद्दल, एका दिग्दर्शकाने तिला सर्व ज्युनियर कलाकारांसमोर सुनावलं होतं. ऐश्वर्या म्हणाली की, ती हा अपमान सहज स्वीकारू शकली असती, परंतु दिग्दर्शकाने लोकांसमोर इतर अभिनेत्रींसोबत तिची तुलना करून तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता.
वर्कफ्रंट
अभिनेत्री ऐश्वर्या राजेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २०११ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. लोकप्रिय साउथ टीव्ही डान्स शो मानदा मयिलादा मधून कलाविश्वात पाऊल ठेवलं. अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या कारकीर्दीत संक्रांतिकी वस्तुनम, कन्ना तसेच'अथाकथी', 'अवर्गलम इवर्गलम', 'काका मुत्ताई', 'वडा चेन्नई' आणि 'काना' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.