पोपटासारखं नाक म्हणत हिणवलं पण 'तो' हरला नाही! अभिनयाच्या प्रेमापोटी वेटरचं केलं काम, व्हिलन साकारून ठरतोय नायकांना वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:02 IST2026-03-05T13:01:44+5:302026-03-05T13:02:57+5:30

दुबईचा गोल्डन व्हिसा असणारा पहिला दाक्षिणात्य कलावंत! अभिनयासाठी हवाई दलाच्या नोकरीवर सोडलं पाणी, बॉलिवूडसह साऊथमध्ये त्याला डिमांड 

south cinema actor nassar struggle story he joined air force then destiny brought him to film industry | पोपटासारखं नाक म्हणत हिणवलं पण 'तो' हरला नाही! अभिनयाच्या प्रेमापोटी वेटरचं केलं काम, व्हिलन साकारून ठरतोय नायकांना वरचढ

पोपटासारखं नाक म्हणत हिणवलं पण 'तो' हरला नाही! अभिनयाच्या प्रेमापोटी वेटरचं केलं काम, व्हिलन साकारून ठरतोय नायकांना वरचढ

South Actor Nassar: मनोरंजन विश्वात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.ज्यांना यशोशिखरावर पोहचण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आहेत. ज्यांनी हलाखीत दिवस काढावे लागले आहे. मात्र, स्वत:च्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत हक्काची जागा निर्माण केली. असेच एक नाव म्हणजे अभिनेते नास्सर. अभिनय हे पहिलं प्रेम असल्याने, अनंत अडचणींवर मात करुन यशोशिखरावर पोहचलेले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी असा मोठा प्रवास करुन नावारुपाला येणाऱ्या या नायकाचा आज जन्मदिवस. 'बाहुबली' चित्रपटातील बिज्जलदेवच्या खलनायकी भूमिकेने संपूर्ण जगभरात चर्चेत आलेले अभिनेता नास्सर कायमच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहतात. मात्र, त्यांचा अभिनयातील हा प्रवास फार काही सोपा नव्हता.

नास्सर यांचा बॉलिवूडमध्ये फार मोठा चाहतावर्ग आहे. नास्सर यांचा जन्म ५ मार्च १९५८ रोजी तामिळनाडू  येथे झाला. त्यांनी सेंट जोसेफ उच्च माध्यमिक विद्यालय (चेंगलपट्टू) मध्ये शालेय शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी भारतीय हवाई दलात काम केलं.मात्र, अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सची फिल्म इन्स्टिट्यूट आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी येथून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.अखेर १९८५ मध्ये त्यांनी 'कल्याणा अगाथिगल' या तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली. आपल्या आजवरच्या या अभिनय प्रवासात नास्सर यांनी तमिळ सोबतच तेलगू, मल्याळम आणि विषेषष म्हणजे हॉलिवूड चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. 

दिसण्यावरून अभिनेत्याला हिणवलं गेलं, पण...

'रोजा', 'वीरम', 'खुशी', 'चाची ४२०', 'रावडी राठोड', 'थलायवी' आणि अखेरीस 'बाहुबली' अशा गाजलेल्या चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नास्सर यांना आपल्या चेहऱ्यावरून अनेकदा टीका सहन करावी लागली होती. नाकाच्या मोठ्या ठेवणीमुळे आणि रुंद कपाळामुळे नास्सर यांच्या चेहऱ्यावर कायम टीका झाली. यशस्वी अभिनेता होण्यासाठी दिसणं नाही तर, अभिनय महत्वाचा असतो. आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांचीच बोलती बंद केली. 

असंख्य अडचणींवर मात करत बनले लोकप्रिय नायक...

नास्सर यांनी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरु केली पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार काही सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाने घरखर्च भागवता येत नव्हता. त्यामुळे पोटासाठी अभिनेत्याने हॉटेलमध्ये वेटर आणि सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केलं. या कठोर परिश्रम आणि जीवनातील चढ-उतारांमध्ये त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट तितक्याच जोमाने ते मेहनत करू लागले.आजवरच्या आपल्या कारकि‍र्दीत नास्सर यांनी ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील या योगदानाबद्दल अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर दुबई युएईचा गोल्डन व्हिसा असणारे पहिले दक्षिण भारतीय कलावंत आहेत. नास्सर यांनी युनिसेफचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं आहे.

Web Title : नास्सर: चेहरे पर ताने, फिर भी अभिनय से बने खलनायक सुपरस्टार।

Web Summary : चेहरे पर टिप्पणियों और आर्थिक तंगी से जूझते हुए नास्सर वेटर बने, फिर प्रसिद्धि पाई। उनकी लगन ने उन्हें 'बाहुबली' में खलनायक सहित 500 से अधिक भूमिकाएँ दिलाईं, जिससे साबित हुआ कि प्रतिभा दिखावट से बढ़कर है। वे यूनिसेफ के राजदूत भी हैं।

Web Title : Nassar: Mocked for looks, actor triumphs with dedication, becomes villainous star.

Web Summary : Actor Nassar overcame appearance-based criticism and financial struggles, working as a waiter before achieving fame. His dedication led to over 500 roles, including the iconic villain in 'Baahubali,' proving talent surpasses looks. He's also a UNICEF ambassador.