स्मृती-पलाशनंतर आणखी एका अभिनेत्रीचं लग्न मोडलं? साखरपुड्याचे फोटो केले डिलीट, होणाऱ्या नवऱ्यालाही केलं अनफॉलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:40 IST2025-12-12T16:40:08+5:302025-12-12T16:40:46+5:30
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचं लग्न मोडल्यानंतर आणखी एका अभिनेत्रीचं लग्न मोडल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता.

स्मृती-पलाशनंतर आणखी एका अभिनेत्रीचं लग्न मोडलं? साखरपुड्याचे फोटो केले डिलीट, होणाऱ्या नवऱ्यालाही केलं अनफॉलो
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचं लग्न मोडल्यानंतर आणखी एका अभिनेत्रीचं लग्न मोडल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता. ही लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार होती. मात्र आता तिचं लग्न मोडलं की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. साऊथ अभिनेत्री निवेथा पेथुराज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
निवेथा साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय होती. काही महिन्यांपूर्वीच निवेथाचा साखरपुडा झाला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. तिने दुबईतील बिजनेसमॅन असलेल्या राजिथ इब्रान यांच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र साखरपुड्यानंतर आता तीन महिन्यांनी निवेथाने तिचे फोटो डिलीट केले आहेत. याबरोबरच तिने होणाऱ्या नवऱ्यालाही अनफॉलो केलं आहे. त्यामुळे तिचं लग्न मोडल्याच्या चर्चा सुरू आहेत.
याबाबत अद्याप निवेथा किंवा तिच्या होणाऱ्या पतीने कोणतंही भाष्य केलेलं नाही. काही सिनेमांमध्ये निवेथाने काम केलं आहे. २०१६मध्ये तिने 'ओरु नाल कूथु' सिनेमातून पदार्पण केलं होतं. तिने विजय सेतुपती आणि प्रभू देवा यांच्यासोबतही काम केलं आहे.