दोन घटस्फोटानंतर १ वर्षाच्या आतच तिसरा संसारही मोडला; प्रसिद्ध अभिनेत्री एकटीनं करणार मुलाचा सांभाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:59 IST2025-11-17T16:58:43+5:302025-11-17T16:59:04+5:30
४३व्या वर्षी अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मीरा वसुदेवन आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अवघ्या एका वर्षांतच मीराचा घटस्फोट झाला आहे.

दोन घटस्फोटानंतर १ वर्षाच्या आतच तिसरा संसारही मोडला; प्रसिद्ध अभिनेत्री एकटीनं करणार मुलाचा सांभाळ
सिनेइंडस्ट्रीत सेलिब्रिटींचं पर्सनल आयुष्य हे कायमच चर्चेत राहिलेलं आहे. सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची कायमच चर्चा होताना दिसते. आता एका साऊथ अभिनेत्रीचा संसार मोडला आहे. ४३व्या वर्षी अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मीरा वसुदेवन आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अवघ्या एका वर्षांतच मीराचा घटस्फोट झाला आहे.
"मी अभिनेत्री मीरा वसुदेवन, हे घोषित करते की मी ऑगस्ट २०२५ पासून सिंगल आहे. मी आता आयुष्यातील सगळ्यात छान आणि शांत अवस्थेत आहे", असं म्हणत मीराने घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. मीराने तिचा तिसरा पती विपिनसोबतचं नातं तोडलं आहे. एका मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये ते लग्नबंधनात अडकले होते. मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांचा संसार मोडला आहे.
विपिन आधी मीराची दोन लग्न झाली होती. २००५ साली तिने विशाल अग्रवालशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर मीराने २०१२ साली जॉन कोकेन यांच्याशी संसार थाटला होता. पण, तिचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. आणि अवघ्या ४ वर्षांतच मीरा आणि जॉनचा घटस्फोट झाला. मीराला जॉनपासून अरिहा हा मुलगा आहे.