आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:55 IST2025-10-01T17:54:47+5:302025-10-01T17:55:09+5:30
गेल्या ३-४ वर्षांपासून अभिनेत्रीला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी असल्याने अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून लांब आहे. ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा देवी चंदना आहे.

आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल
प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून अभिनेत्रीला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी असल्याने अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून लांब आहे. ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा देवी चंदना आहे. ४३ वर्षीय देवी चंदना यांना आजारामुळे नुकतंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती.
सुरुवातीला देवी चंदना यांना करोना झाला होता. करोनामधून बरं झाल्यानंतर त्यांना H1N1 या आजाराची लागण झाली होती. आता त्यांना हेपेटायटिस ए हा आजार झाला आहे. नुकतंच देवी चंदना यांनी व्लॉगमधून याबद्दल माहिती दिली आहे. ओनम सणाच्या दरम्यान त्यांना हेपेटायटिस ए आजार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दोन आठवडे रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. "सुरुवातीला मला वाटलं की श्वास घेण्यास त्रास होत आहे तर नॉर्मल असेल. पण, हॉस्पिटलला गेल्यानंतर समजलं हेपेटायटिस ए झाला आहे", असं देवी चंदना त्यांच्या व्लॉगमध्ये म्हणाल्या.
देवी चंदना यांनी व्लॉगमध्ये त्यांचे हेल्थ अपडेट्स दिले. "माझ्या लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं होतं. मी ICU मध्ये होते. दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर मी बरी झाली आहे. जेव्हा मला करोना झालेला तेव्हा वाटलेलं यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. पण, त्यानंतर लगेच सहा महिन्यांत मला H1N1ची लागण झाली. तेव्हा मला कमी त्रास झाला होता. आता हेपेटायटिस ए आजार झाल्यानंतर मला कळलं की हे सगळ्यात जास्त गंभीर आहे", असं देवी चंदना यांनी सांगितलं.